वाशिम - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाशिम शहरातील निमजगा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना किराणासह अन्य वस्तू खरेदीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वाशिम शहरातील निमजगा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मागील काही दिवसांपासून हा परिसर रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना किराणासह इतर समस्या भेडसावत आहेत. येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली कैफियत मांडणार होत्या. मात्र पोलिसांनी परिसर सील केल्यामुळे त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास या महिलांना मनाई करण्यात आल्याने महिलांनी या परिसरातच मंगळवारी एक तास ठिय्या मांडला होता. प्रशासनाने रेड झोनमध्ये आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.