वाशिम - आपण माणसांचे तसेच प्राण्यांचे वाढदिवस साजरे करतो. मात्र, वाशिम जिल्ह्यातील सुदी येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्हाट्सआप ग्रुपचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी गावाला जेवण देण्याात आले. तसेच केकही कापण्यात आला. विशेष म्हणजे केक कापण्यासाठी शेतकऱ्यांसोबत रिसोडचे आमदार अमित झनकही उपस्थित होते.
वॉट्सअॅप ग्रुपचा सकारात्मक उपयोग -
सध्या अनेकांच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आला. त्यात प्रामुख्याने वाट्सअॅप असतेच. मात्र, या वॉट्सअॅपवर क्षणातच अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यापैही काही माहिती किंवा पोस्ट या खोट्या असतात. त्याचा दुरुपयोग होताना दिसतो. मात्र, वाशिमच्या सुदी गावातील विनोद भोयर या शेतकऱ्याने वॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल, हे दाखवून दिले आहे.
केक कापून वाढदिवस साजरा -
या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 600 शेतकरी असून या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीबद्दल माहिती दिली. तसेच फवारणी, पेरणी, बियाणे, खत याबद्दल विचारांचे अदान-प्रदान केले जाते. वाशिमच्या मालेगावच्या सुदी या छोट्या गावात साकारलेली ही संकल्पना हळूहळू सर्वांना आवडू लागली. या माध्यामातून एक, दोन नाही तर तब्बल 35 ग्रुप निर्माण करण्यात आले आहे. या ग्रुपचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापण्यात आला आणि गावाला जेवणही देण्यात आले. तसेच यावेळी शेती आणि पर्यावरण याविषयावर मार्गदर्शन शिबीरही आयोजित करण्यात आले होते.
हेही वाचा - राजकारणात येण्याच्या भानगडीत पडू नका, अजित पवारांचा विद्यार्थ्यांना सल्ला