वाशिम - संततधार पावसामुळे स्थानिक पंचशील नगरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाचे पाणी घरात घुसल्याने या नागरिकांचे हाल होत आहेत. याप्रकाराकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
गेल्या 12 दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात वाशिम शहरात पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले आहे. काही भागांत सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात पाणी शिरत आहे.
पावसाळ्यात संततधार पाऊस झाला तर घरांमध्ये पाणी शिरू सकते, अशी भीतीही नागरिकांनी नगर परिषद अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. मात्र याकडे कूणीही लक्ष दिले नसल्याने आज नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहेत.