ETV Bharat / state

वाशिमचे एस.पी. अॅक्शन मोडवर; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Washim Police

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे.

नियमांची पायामल्ली करणाऱ्यांवर कारवाई
नियमांची पायामल्ली करणाऱ्यांवर कारवाई
author img

By

Published : May 7, 2021, 10:04 AM IST

वाशिम - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या 1 मे पासून नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र 11 नंतर विनाकारण फिरण्याऱ्यांना रस्त्यावर फिरण्यास मनाई असून, 11 वाजल्यानंतरही काही नागरिक काम नसतांना घराबाहेर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे आज वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी एक्शन मोड मध्ये आले आहेत. वाशिम शहरातील मुख्य चौकात विनाकारण फिरण्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

वाशिमचे एस.पी. एक्शन मोडवर

ट्रिपल सीट फिरणाऱ्यांचे प्रमाण जास्त

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिलपासून संचारबंदीचे सुधारित आदेश लागू केले आहेत. १५ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसांत वाशिम पोलिसांनी वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाऱ्या जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण घटले असून, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

२१ दिवसांत जवळपास ३१०० जणांवर कारवाई

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियमांचे पालन तसेच चालकांनी मास्कचा वापर करावा, असे निर्देश आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाशिम शहरात वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. गत २१ दिवसांत जवळपास ३१०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स नसणे, मास्क नसणे, ट्रीपल सीट तसेच कोणतेही कारण नसताना विनाकारण फिरणे आदी कारणांचा समावेश आहे.

हेही वाचा - टोल झोल! कोरोनाच्या एका वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वाढले 84 टोल प्लाझा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.