वाशिम - राज्यभर गौरी-गणपतीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. वाशिम शहरातील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्या सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी गौरी पूजन अनोख्या पद्धतीने साजरे केले आहे. सिंधुबाई यांनी आपल्या दोन्ही सुनांना गौरींच्या जागी बसवून त्यांची पुजा केली.
दोघींपैकी एक (रेखा) जिल्हा परिषद शिक्षिका आहे तर दुसरी (पल्लवी) गृहिणी आहे. सुनांच्या रूपात चालत्या-बोलत्या महालक्ष्मींचा सोहळा साजरा करून सिंधुबाई सोनुने समजापुढे आदर्श निर्माण केला आहे. हा आगळा-वेगळा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
हेही वाचा - कौतुकास्पद!. शिक्षणापासून वंचितांना ज्ञानदानाचे कार्य; नागपुरातील महिलेचा आदर्श
सासू आणि सुनेच्या नात्यामधील सलोखा आणि जिव्हाळा कायम रहावा असा, आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितले.