ETV Bharat / state

मान्सून २०२० : पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला

सोनाळा येथील अडान नदीवर सोनल प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. त्याच सोनाळा प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी नदीवरून काढण्यात आले. तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला.

monsoon in washim
मान्सून २०२०: पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला
author img

By

Published : Jul 18, 2020, 4:50 PM IST

वाशिम - सोनाळा येथील अडान नदीवर सोनल प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. त्याच सोनाळा प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी नदीवरून काढण्यात आले. तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला. सोनाळा रस्त्यावर पुलाची उंची कमी असल्यामुळे त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सोनाळा येथील ग्रामस्थांना ये-जा करता येत नाही. गावाच्या मागील बाजूस हा प्रकल्प आहे.

मान्सून २०२०: पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला
त्यामुळे सभोवतालच्या परिसरात प्रकल्पाचा सांडवा असून संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसलाय. हा एकमेव रस्ता असल्याने गावाशी संपर्क तुटला आहे. आजारी व्यक्तींना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यात अडचणी येत आहे.

पुलावरून पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे रस्ता करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात आणि काही ठिकाणी विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.