ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये इंजनिअरची गेली नोकरी : चहाचे दुकान टाकून जीवनात आणला गोडवा - washim Unemployed Engineer news

लॉकडाऊनमुळे अनेक तरूणांच्या नोकऱ्या गेल्या. अशाच एका कारंजातील सारंग राजगुरे या मेकॅनिकल इंजिनिअर युवकानेही पुणे सोडून गाव गाठले आणि चहा व नाश्ता कॅन्टिन टाकून बेरोजगारीवर मात केली.

चहा व नाश्ता कॅन्टिन
चहा व नाश्ता कॅन्टिन
author img

By

Published : Oct 31, 2020, 8:58 AM IST

वाशिम - कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय बदलले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेकजण नोकरी सोडून गावी परतले. अशाच एका कारंजातील सारंग राजगुरे या मेकॅनिकल इंजिनिअर युवकानेही पुणे सोडून गाव गाठले आणि चहा व नाश्ता कॅन्टिन टाकून बेरोजगारीवर मात केली.

कारंजा येथील सारंग राजेंद्र राजगुरे या तरूणाने अमरावती येथून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील एका कंपनीत तो नोकरी करत होता. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत गेला. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली. त्यामुळे सारंग बेरोजगार झाला. बेरोजगार झाल्याने गावात परत यावे लागले. सांरगपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न होता. अखेर सारंगने चहा आणि नाश्ता कॅन्टिन टाकण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसाय सुरू झाला.

चहाचे दुकान टाकून जीवनात आणला गोडवा

वडिलांचे तीन महिन्यांपासून वेतन नाही...

सारंगचे वडील एसटी महामंडळात नोकरीवर आहे. लॉकडाऊनमुळे एसटी सेवा ठप्प होत्या. त्यामुळे जवळपास चार महिन्यांपर्यंतचे वेतन झाले नाही. शिवाय सारंगचीही नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक चणचण भासायला लागली. सारंगला रोजगार मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सारंगने या व्यवसायाची निवड केली.

स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसचा होता पर्याय...

मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेवून सारंग पुण्यात नोकरीसाठी गेला. दरम्यान, सारंगचा स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू होता. नोकरी गेल्यावर कारंज्यात स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करावेत, असा विचार सारंगने केला होता. मात्र लॉकडाऊनमुळे ते वर्ग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याची निराशा झाली. परंतु, या संकटसमयी देखील हार न मानता सारंगने चहा विकण्याचा निर्णय घेतला.

सारंगने दोघांना दिला रोजगार...

चहा आणि नाश्ता कॅन्टिन टाकल्यामुळे तिथे कामगारांची गरज भासली. त्यामुळे दोन कामगारांना त्याठिकाणी रोजगार मिळाला. सारंगला पुण्यात असताना 12 तास काम करून 15 हजार रुपये मिळायचे. मात्र आता दोन कामगारांना रोजगार देऊन 20 हजार रुपयांच्या वर महिना मिळत असल्याची माहिती सारंगने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.