वाशिम - पैसे जमा करण्यासाठी दुचाकीने बँकेत जात असताना चौपाल सागरच्या व्यवस्थापकाला अज्ञान व्यक्तीने १० लाख रूपयांनी लुटले. त्याच्याजवळील तब्बल ९ लाख ६० हजार ६२७ रुपयांची बॅग लंपास केले. या व्यवस्थापकासोबत सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली. ही घटना वाटाणे लॉन्स जवळ घडली आहे.
अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चौपाल सागरचे व्यवस्थापक दर्शन उमाकांत जोशी (वय ३५) रा. नालंदा नगर आणि सुरक्षा रक्षक राजू हरिभाऊ इंगळे हे त्यांच्या दुचाकीवरुन रोख रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात होते. दरम्यान अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाटाणे लॉन जवळ त्यांच्या दुचाकीला विना नंबरच्या स्कुटीने मागून धडक दिली. त्यानंतर दोन अज्ञात आरोपींनी व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील पैशाची बॅग पळविली.