ETV Bharat / state

मलकापुरात आढळले दोन मृतदेह; एकाची ओळख पटली, एक अनोळखी - अनोळखी

जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज (मंगळवारी) वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मलकापुरात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह; एकाची ओळख पटली, एक अनोळखी
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:48 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज (मंगळवारी) वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतापैकी एकाची ओळख पटली असून प्रेमचंद सुरेशसिंग चौधरी (वय, 28 रा. ग्राम नेवला ता. ईगलास अलीगढ, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर दुसरा मृतदेह अनोळखी आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मलकापुरात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह; एकाची ओळख पटली, एक अनोळखी

मलकापूर शहरातील विश्रामगृह आवारात एक अनोळखी मृतदेह असल्याची माहिती सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरु केला. त्याचवेळी नांदुरा रोडवरील उंबरनाला परिसरात आणखी एक मृतदेह असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यामधील एकाची ओळख पटली असून दुसरा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी विश्रामगृह आवारातील मृताचा पंचनामा केला. त्यावेळी मृताच्या उजव्या हातावर प्रेमचंद गोंदलेले असून खिशात सापडलेल्या डायरीतील मोबाईल नंबरवर कॉल करुन त्याचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवले. त्यावेळी मृताचे नाव प्रेमचंद चौधरी असल्याचे समोर आले. तर नांदुरा रोडवरील उंबरनाला परीसरात 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

या मृतदेहाच्या अंगात राखाडी कलरचा बरमुडा असून गळ्यात भगवान येशू ख्रिस्तांचे लॉकेट आहे. त्यामुळे नातेवाईकांनी ओळख पटवण्यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Intro:Body:बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर शहरात आज मंगळवारी ११ जूनला वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह मिळून आल्याने शहरात एकच खळबळ ऊडाली मृतकांपैकी एकाची ओळख पाटली असून दुसरा मृतदेह अनोळखी आहे.याच तपस पोलीस करीत आहे.

मलकापूर शहरातील विश्रामगृह आवारात एक अनोळखी मृतदेह पडलेला असल्याची माहिती सकाळी पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरु केलाच होता कि आणखी एक मृतदेह नांदुरा रोडवरील उंबरनाला परीसरात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ ऊडाली.यातील एकाची ओळख पटली असुन दुसरा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी विश्रामगृह आवारातील मृतकाचा पंचनामा केला असता मृतकाच्या उजव्या हातावर प्रेमचंद गोंदलेले असुन खिशात सापडलेल्या डायरीतील मोबाईल नंबरवर काँल करून त्याचे फोटो व्हाँटसअप वर पाठविले असता तो मृतक प्रेमचंद सुरेशसिंग चौधरी वय 28 रा.ग्राम नेवला ता.ईगलास अलीगढ यु.पी.चा असल्याचे निष्पन्न झाले.तर नांदुरा रोडवरील उंबरनाला परीसरात 35 वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह असू त्याच्या अंगात राखोंडी कलरचा बरमोडा घातली असुन गळ्यात भगवान येशु ख्रिस्तांचे लाँकेट आहे याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवला आहे. नातेवाईकांनी ओळख पटविण्यासाठी मलकापुर शहर पो.स्टे शी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांचा संबंध आहे का याचा तपस पोलीस करीत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.