वाशिम - येथील मंगरुळपीर-मानोरा मार्गावर आमगव्हान जवळ कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. यात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. तर शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
हेही वाचा-वाशिममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या ११०० गणेशमूर्ती
जखमींना तातडीने मानोरा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर यामध्ये अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या अपघातात अंदाजे लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. तर घटनास्थळी मानोरा पोलिसांची कार्यवाही अद्याप सुरु आहे.