वाशीम - जिल्ह्यात आज (16 जुलै) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील शेलुबाजार येथील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे या पुलावर ट्रकच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच शेलुबाजार चौकातील पोलीस चौकी, बुलडाणा बँकसह काही दुकानामध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद-नागपूर, अकोला-दिग्रस मार्ग शेलुबाजार चौकातून जात असून गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या मार्गाच्या कामामुळे चौकात पाणी साचते. त्यामुळे वाहधारकांसह दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेलुबाजार जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबाद-नागपूर मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जर वेळीच उपाययोजना केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. आतातरी प्रशासनाने जागे होत तात्पुरती का होईना याठिकाणाहून वाहने जातील, अशी सोय करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प - वाशिममध्ये मुसळधार
आज वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार चौकात असलेल्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती.