वाशिम - जिल्ह्यातील डव्हा, खिर्डा, जाउळका परिसरात वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या 2 दिवसापासून वाघीण आणि तिचे बछडे अनेक शेतकऱ्यांना दिसत आहेत. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून खिर्डासह इतर गावांमध्ये दवंडी देऊन सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - केनवडजवळ भरधाव कंटेनरने तरुणाला चिरडले; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
खिर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी काल मध्यरात्री शेतात पिकाला पाणी देताना या वाघिणीला पाहिले व त्याचे व्हिडिओ काढून पोलीस प्रशासनाला माहिती दिली. पोलीस प्रशासनाने तात्काळ वन विभागाला कळविले. वन विभागाने शुक्रवारी रात्री नागपूर-मुंबई महामार्गावर जवळका जवळील पुलावर अर्धा तास वाहतूक थांबवून वाघीणाचा शोध सुरू केला. मात्र, वाघिणीचा शोध लागला नाही. खिर्डा ग्रामपंचायत व वन विभागाच्या वतीने गावातील नागरिकांना सतर्क राहणे व वाघीण दिसल्यावर याची माहिती प्रशासनाला द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! पुण्याला जाणाऱ्या खासगी बसमध्ये तरुणीवर बलात्कार