वाशिम - दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किन्हीराजा शाखेच्या तिजोरीतून ३ मे च्या मध्यरात्री चोरट्याने चक्क १४ लाख ८९ हजार २१४ रुपयाची तिजोरी चोरून नेल्याची घटना घडली होती. अखेर चोरी प्रकरणातील रिकामी तिजोरी मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा नदीजवळल भागात शोधून काढण्यास श्वान पथकाला दुपारी १२ वाजताच्या सुमारास यश आले.
किन्हीराजा बँकेत चोरट्यांनी ३ मे च्या मध्यरात्री बँकेसमोर वाहने उभे करून बँकेचे शटरला असेलेले कुलूप गॅस कटरने तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील १४ लाख ८९ हजार २१४ रोख रकमेची तिजोरी वाहनात घालून लंपास केली होती. बँकेत झालेल्या चोरीने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. पोलिसांनी तपासाच्या दिशेने चक्र फिरविले आहे. आज पोलीस तपास करीत असताना श्वान पथकाने खाली तिरोजीचा छडा लावल्याने पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.