वाशिम - जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन काढणीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. त्यानंतर रब्बीतील गहू, हरभरा, पिकांची अवकाळी पावसाने नासाडी झाली. मात्र, तरीही न डगमगता कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील शेतकऱ्यांनी 20 एकरावर उन्हाळी सूर्यफूल पीक घेतले आहे.
दरम्यान, त्यांचा हा प्रयोग चांगलाच फायद्याचा ठरला असून पीक चांगलच बहरले आहे. त्यामुळे दोन्ही हंगाम हातातून गेल्यावरही सुर्यफूल पिकातून एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न अपेक्षित असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.