कारंजा (वाशिम) - तालुक्यात 2 आणि 3 मेला दमदार पाऊस झाला होता. यानंतर येथील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कापूस लागवडीला प्रारंभ केला आहे. 3 मेनंतर पाऊस झाला नाही. यामुळे कापूस लागवडीसाठी शेतकरीवर्गाला तुषारसंचाचा सहारा घ्यावा लागल्याचे चित्र आहे.
यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र, पावसाने उघड दिल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी तुषार सिंचन करीत आहेत. तर यामुळे कोरडवाहू शेतकरी अडचणीत आले आहेत.