वाशिम - जिल्ह्यातील अनेक भागामध्ये बुधवारपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहायला मिळणार की नाही अशी शंका होती. मात्र, आज गुरुवारी सकाळी ८.४२ वाजण्याच्या सुमारास सूर्यग्रहण दिसले.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. मात्र, त्याठिकाणी देखील सूर्यग्रहण दिसले. जवळपास ८० ते ८४ टक्के सूर्य चंद्रबिंबामुळे झाकले होते.
सूर्यग्रहणादरम्यान घ्यावयाची काळजी -
1. सूर्य ग्रहणादरम्यान उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहून नये. यामुळे सूर्याची अतिनील किरणे आणि इतर घातक परावर्तने थेट डोळ्यांवर पडतात. यामुळे डोळ्यांची हानी होते.
2. सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर चश्म्याचाच वापर करावा.
3. सोलर फिल्टर चश्म्यांना सोलर-व्ह्युइंग ग्लासेस किंवा पर्सनल सोलर फिल्टर्स किंवा आयक्लिप्स ग्लासेस असेही म्हटले जाते.
4. असा चश्मा नसल्यास सूर्यग्रहण आजिबात पाहू नये.
5. सूर्यग्रहणादरम्यान सूर्याला पिनहोल, टेलेस्कोप किंवा दूर्बीणीतूनही पाहू नये.