वाशिम - औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका काटेपूर्णा नदीवरील पूल हा कित्येक वर्षांपासून ढासळत चालला आहे. या पुलावर मोठं मोठे खड्डेसुद्धा पडले आहेत. याच पुलावरून रोज वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नवीन पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी वाशिम जिल्ह्यातील शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) पुलावर पडलेल्या खड्यांवर केक ठेऊन व फटाके फोडून वाढदिवस साजरा केला.
दरवर्षी, या पुलावर मोठं मोठे खड्डे पडत असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघातही झाले. मात्र, प्रशासनाच्यावतीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. दरवर्षी या रस्त्याची परिस्थिती हीच असते. त्यामुळे आज शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करून रोष व्यक्त केला.
शासनाने आतातरी दखल घेऊन हा पूल बांधावा नाहीतर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोळे, प्रदीप पाटील यांनी दिला.
शिवसंग्रामने फटाके फोडून केला खड्डे पडलेल्या पुलाचा वाढदिवस साजरा - वाशिम न्यूज
औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका काटेपूर्णा नदीवरील पूल हा कित्येक वर्षांपासून ढासळत चालला आहे. या पुलावर मोठं मोठे खड्डेसुद्धा पडले आहेत. वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नवीन पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी वाशिम जिल्ह्यातील शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) पुलावर पडलेल्या खड्यांवर केक ठेऊन व फटाके फोडून वाढदिवस साजरा केला.