वाशिम - 'कहा राजाभोज, कहा गंगू तेली' असे म्हणत आमदार अबू आझमी यांनी जोरदार टीका केली आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महारांजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना केल्याने सर्वत्र संताप व्यक्त आझमी यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे. ते वाशिममध्ये बोलत होते.
हेही वाचा - वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित
यावेळी बोलताना ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला नाही. दरम्यान, केंद्राच्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशात सर्वधर्मीय समाज असहकार आंदोलन सुरू करेल. नरेंद्र मोदींवर टीका करतानाच त्यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले.