ETV Bharat / state

हा जलदूत भागवितो 300 कुटुंबियांची तहान, पाणीबाणी असलेल्या सौंदड गावात करतो पाणीपुरवठा - रोशन शिवणकर गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील सौंदड गावाला पाणी पुरवठा करणारी चुलबंद नदीच कोरडीठाक पडल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची भ्रांत झाली. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून तर लहान बालकांमध्येसुद्धा आणीबाणी दिसून येत आहे. ही बाब रोशन शिवणकर या तरूणाच्या लक्षात आली. तेव्हा त्याने प्रशासनकडून रीतसर परवानगी घेत गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो नागरिकांची तहान भागवत आहे.

roshan shivankar supplying water to saundad village in gondia
सौंदड
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:01 AM IST

गोंदिया :- जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. असेच एक गाव गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड आहे. या गावाजवळ चुलबंद नदी आहे, मात्र ती कोरडीठाक पडल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या भेडसावत आहे. या गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी ३० वर्षीय रोशन शिवणकर हा जलदूत म्हणून धावून आला आहे. दररोज तो तब्बल तिनशे कुटुंबीयांना टँकरेद्वारे तब्बल दीड लाख लिटर पाणी मोफत पुरवितो.

पाणी टंचाई गोंदिया जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली आहे. गेल्या तीन वर्षांत ही समस्या भीषण रूप धारण करू लागली आहे. लोकांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांना काय पाजणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच भीषण परिस्थिती सौंदड गावाची आहे. या गावाला पाणी पुरवठा करणारी चुलबंद नदीच कोरडीठाक पडल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची भ्रांत झाली. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून तर लहान बालकांमध्येसुद्धा आणीबाणी दिसून येत आहे. ही बाब रोशन शिवणकर या तरूणाच्या लक्षात आली. तेव्हा त्याने प्रशासनकडून रीतसर परवानगी घेत गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो नागरिकांची तहान भागवत आहे.

पाणीबाणी असलेल्या सौंदड गावात रोशन करतोय पाणीपुरवठा..

दरवर्षीचा उन्हाळा हा सौंदड गावासाठी सर्वात कठीण काळ असतो. यावर्षी ही पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई, गैरप्रशासन, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर या कारणांमुळे आहे. सोबतच कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाल्याचे अधिकारी सांगतात. परंतु यंदा रोशनसारखा जलयुवक नागरीकांसाठी जलदूत म्हणून धावून आला नसता तर नक्कीच पाण्यासाठी मोठी आणीबाणी निर्माण झाली असती हे मात्र खरे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी सौंदड येथील पाणीटंचाईवर उपाय शोधल्यास रोशन शिवणकरसारख्या जलदूताला नागरिकांवर आलेली पाणी टंचाई दूर करण्यास धावून येण्याची गरज पडणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.