वाशिम -आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ( World Disability Day ) हा दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट जागरूकता वाढविणे आणि अपंग लोकांना स्वीकारण्यासाठी समज विकसित करणे हे आहे. अपंगत्वावर मात करत नव्या उमेदीने आयुष्य सुंदर बनवण्यासाठी अभुतपुर्व किमया साधणाऱ्या वाशिममधील रितेश जवादेवर ( Ritesh Jawade ) आज आंतरराष्ट्रीय विकलांग दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही मराठीचा विशेष रिपोर्ट...
वाशिमपासून 3 किमी दूर असलेल्या शासकीय तंत्र निकेतन ( Shaskiya Tantra Niketan ) समोरीस वस्तीत राहिणारा 20 वर्षीय रितेश महादेव जवादे ( Ritesh Mahadev Jawade ) या तरुणाने अपंगत्वाला खचून न जाता नव्या उमेदीने आयुष्य सुंदर बनवण्यासाठी अभुतपुर्व किमया साधली आहे. रितेश जन्मता सिरेबल पोलिओ ( Cerebellar Polio ) या आजारामुळे शंभर टक्के अपंग आहे. त्याची दैनदिन कामे ही तो स्वतः करू शकत नाही. त्यासाठी त्याला त्याच्या आई वडिलांची मदत घ्यावी लागते. पण दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने निरक्षर असतानाही आजच्या युगात दैनदिन कामासाठी अत्यावश्यक समजली जाणारी अवघड संगणक, इंटरनेट अशा आधुनिक प्रणालीची पाळमुळ आत्मसात केली.
जन्मताच रितेश हा सेरेब्रल पाल्सीमध्ये ( Cerebral Palsy ) 100 टक्के अपंग आहे. सन 2005 मध्ये रितेशचे वडील सैन्य सेवेत असताना, वयाच्या 11 व्या वर्षी आर्मीच्या आशा रीहाबिलीटेशण सेंटर, पठाणकोट येथे तो पायाच्या अंगठ्याने पियानो सोबत खेळत होता. त्यावेळेस 8 गोरखा रायफल्सचे ब्रिगेडियर संजीव खत्री यांच्या पत्नी श्रीमती रत्नांजली खात्री यांनी रितेश हा पायाने कम्प्युटर चालवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला व आर्मी हेड क्वार्टर येथून जनरल जे जे सिंग AVSM यांच्याकडून एक जुने कम्प्युटर रितेशला भेट दिले. तेव्हापासून रितेश हा अविरत कम्प्युटर पायाने चालवितो. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्याला शालेय शिक्षण अजिबात नाही. तरीही कम्प्युटर फॉरमेटिंग करणे, नवीन सॉफटवेअर डाउनलोड करणे फेसबुक, ट्विटर , ईमेल तसेच सलमान खान यांच्या बिईंग हुमन एन. जी. ओ व इतर सिलेब्रिटी यांना भेटण्याची रितेशची इच्छा आहे, असे रितेशच्या वडिलांनी सांगितले.
रितेश हा दिनचार्येसाठी जसे ब्रश करणे, कपडे घालणे, जेवण करणेसाठी आई-वडील यांच्यावर अवलंबून आहे. देशातील सामाजिक संस्था व एन. जी. ओ संस्था यांनी रितेशला वेद्यकीय उपचार व कम्प्युटरचे पुढील मदत करण्याचे आव्हान रितेशच्या आई-वडिलांनी केले.
रितेशने मेहनतीच्या जोरावर तंत्रज्ञानाची किमया अवगत करून आभाळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केलाय. शरीरात अनेक अवयव नसतांना तो संगणवरील सर्व काम पायाने करत असतो. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातुन त्याने सेलिब्रेटी आणि लोकप्रिय नेत्यांच्या स्तुत्य उपक्रमांची माहितीही गोळा केलीय. त्याच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.