वाशिम - केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करून आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अशोकराव चव्हाण फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत. अशोकराव चव्हाण यांना मराठा आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यांनी मराठा आरक्षणचे वाटोळे केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना साथ देत आहेत असे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज (गुरूवार) वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
अशोक चव्हाणांची हकालपट्टी करावी -
अशोकराव चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या पदावर राहण्याचे काहीच अधिकार नाहीत, त्यांना एक मिनिटही त्या पदावर ठेवू नये त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
हेही वाचा - Maratha Reservation :...तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल - अशोक चव्हाण
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय स्वागतार्ह -
केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करून आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तो स्वागत करण्यायोग्य आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार ही मानले, असे मेटे म्हणाले.
हेही वाचा - मराठा आरक्षण : ..तरच राज्याचे अधिकार अबाधित राहतील- चंद्रकांत पाटील
हेही वाचा - राज्य सरकारने आता पळवाट न काढता मराठा समाजाला न्याय द्यावा - प्रविण दरेकर