वाशिम - जिल्ह्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या परतीच्या पावसामुळे 'ऑक्टोबर हिट'मुळे त्रासलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसामुळे जिल्ह्यातील हंगामी सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
सध्या जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू असून शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामात व्यग्र आहे. यातच, रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तर, सोयाबीनची काढणी केलेल्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - वाशिममध्ये अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
हेही वाचा - आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढून भरला उमेदवारी अर्ज