वाशिम - जिल्ह्यात संततधार पावसामुळे आणि बुलडाण्यातील पेनटाकळी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यातील करडा-गोभणीसह धोडप बुद्रुक हा ग्रामीण मार्ग आता बंद झाला. पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशार दिला आहे..
हेही वाचा - पेनटाकळी धरणाचे 9 दरवाजे उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रिसोड तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. तसेच पेनटाकळी प्रकल्पाच्या ९ क्रमांकाच्या दरवाज्यांमधून ९ हजार ९५० क्युसेक वेगाने पैनगंगेत पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरूवारी सकाळपासून करडा-गोभणी व धोडप बुद्रुक हा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. पेनटाकळी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - परतीच्या पावसाने प्रकल्प भरले तुडुंब; संगमेश्वर प्रकल्प ओव्हर फ्लो
धरणातून विसर्ग वाढवला तर रिसोड व वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - ईडी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन