वाशिम - धनज पोलिसांनी कामरगावपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या उंद्री शिवारातील उंद्री सिंचन प्रकल्पात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचे प्रात्याक्षिक केले. यात पोलिसांसह कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचा चमू सहभागी झाला होता. पावसाळा तोंडावर असल्याने व पावसाळ्यात एखादा व्यक्ती धरणात बुडाल्यास त्याला कसे वाचवावे याचे प्रात्यक्षिक धनज पोलिसांनी करून दाखविले.
उंद्री सिंचन प्रकल्पात पोलिसांचे प्रात्याक्षिक पोलिसांच्या या मॉक ड्रिलमुळे सभोवतालच्या परिसरात उंद्री सिंचन प्रकल्पात व्यक्ती बुडाल्याची वार्ता पसरली. परंतु त्यानंतर काही वेळाने हे पोलिसांचे प्रात्यक्षिक असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारीअनिल ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, पोलीस पाटील नितीन शिंगाडे, तलाठी विवेक नागलकर, पोलीस कर्मचारी रवींद्र राजगुरे, शामल ठाकूर, विलास तायडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई, श्याम कडू, विजय भुसे, रामदास पारधी, धनंजय रिठे व सागर म्हस्के सहभागी झाले होते.
हेही वाचा - आजीने दिले दीड वर्षीय चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याने चटके, अखेर दुर्दैवी मृत्यू