वाशिम - उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवाकडून जल्लोष करण्यात येत आहे. वाशिममध्येही मराठा क्रांती समन्वय समिती आणि मराठा समाज बांधवांनी वाशिम येथील स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांला हार अर्पण करत फटाके फोडून जल्लोष केला आहे. यावेळी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - मराठा आरक्षण कार्यकर्ते