ETV Bharat / state

जन्मदात्या वडीलांसह सावत्र आईकडून चिमुकल्यांना निर्दयीपणे मारहाण - माधुरी भोयर, बाल संरक्षण अधिकारी, वर्धा.

वाशिम आपल्या चुमुकल्या मुलाला आणि मुलीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील चिमुकल्याच्या अंगावरील व्रण पाहून अश्रु अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. या निर्दयी सावत्र आई आणि जन्मदात्या वडीलावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटकेची मागणी बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी केली.

own child beaten by stepmother along with birth father in washim
जन्मदात्या वडीलासह सावत्र आईकडून चिमुकल्यांना निर्दयीपणे मारहाण
author img

By

Published : Jul 1, 2021, 11:19 AM IST

वर्धा - प्रत्येक जण आपल्या चिमूकल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत असतो. मात्र वर्ध्यात आपल्या चुमुकल्या मुलाला आणि मुलीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील चिमुकल्याच्या अंगावरील व्रण पाहून कोणाचाही थरकाप उडेल. स्वतःच्या मुलांना मारहाण करणाऱ्या या दाम्पत्याला बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून पोलिसांनी अटक केली आहे.

जन्मदात्या वडीलांसह सावत्र आईकडून चिमुकल्यांना निर्दयीपणे मारहाण

अंगावरील जखमा सांगत होत्या अमानुष पणाची कहाणी -

दोन दिवसांपूर्वी चाईल्डलाईनच्या 1098 हेल्पलाईनवर लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून चाईल्डलाईनच्या चमूने आर्वी तालुक्यातील ते गाव गाठून चौकशी सुरू केली. जेव्हा चमू गावात पोहचला तेव्हा जे वास्तव पुढे आले ते फारच धक्कादायक होते. यावेळी 8 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी एका झाडाजवळ बसून होते. चाईल्डलाईनच्या पथकाने दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या चिमुकल्यानी घटनाक्रम सांगितला. मुलांच्या अंगावर अनेक जखमाअसून त्या या अमानुष मारहाणीची कहाणी सांगत होत्या. दरम्यान चाईल्डलाईनचे जिल्हा समनवयक आशिष मोडक यांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांवर कारवाई सुरू केली. त्यांनी आई वडीलांपासून मुलांची मुक्तता करत पुलगाव पोलीस स्टेशन गाठले. संबंधिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी -

बालकल्याण समितीसमोर विषय आल्यानंतर त्यांनी मुलांच्या शरीरावरील जखमा पाहिल्या. हा अमानुष प्रकार मागील चार-पाच वर्षांपासून असाच सुरू होता. हा प्रकार मारहाणीपुरता थांबला नसून एकदा या चिमुकल्यांना जंगलात नेऊन सोडून देण्यात आले होते. पण सुदैवाने मुलांना जगंलात सोडल्यानंतर ते परत गावाच्या दिशेने धावत निघाले अन मुलांचा जीव वाचला. इतका निर्दयीपणा सावत्र आई आणि जन्मदात्या वडीलाने केला. यामुळे यांच्यावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटकेची मागणी बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी केली. यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे.

जन्मदात्या पित्यासह सावत्र आईला अटक -

त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलांचे वडील आणि सावत्र आईला अटक केली. मुलांचा अमानवी छळ संताप आणणारा आहे. आपल्या आजूबाजूला मुलांचा छळ होत असल्यास सजग राहून वेळीच आळा घालण्याची गरज आहे. मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असे काही प्रकार घडल्यास, याची माहिती चाईल्डलाईन किंवा बालकल्याण विभागाला कळवण्याचे आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.