ETV Bharat / state

Monkey In Washim : जखमी माकडाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडांनी केला तासभर रास्ता रोको

महागाव - कारंजा रस्त्याने ( Mahagaon Karanja Road Washim ) जाणाऱ्या एका वाहनाने एका माकडाला धडक देत जखमी ( Monkey Injured In Vehicle Collision ) केले. त्यावेळी आसपास असलेल्या इतर माकडांनी लगेचच त्याच्याकडे धाव घेतली. रस्त्यावर मोठ्या संख्येने जमून इतर माकडांनी सर्व वाहतूक अडवून ( Monkeys Blocked Road In Washim ) ठेवली. मात्र, त्या जखमी माकडाने जागेवरच आपले प्राण ( Monkey Died In Road Accident ) सोडले. हा हृदयद्रावक प्रसंग रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

माकडाचा जीव वाचविण्यासाठी माकडांनी केलं तासभर रस्ता रोको

author img

By

Published : Jan 1, 2022, 3:11 PM IST

Updated : Jan 1, 2022, 3:39 PM IST

वाशिम : महागाव - कारंजा मार्गावर ( Mahagaon Karanja Road Washim ) एक वाहनाने माकडाला धडक ( Monkey Injured In Vehicle Collision ) दिली. अन्य माकडांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या माकडाचा मृत्यू ( Monkey Died In Road Accident ) झाला. त्यामुळे बिथरलेल्या इतर माकडांनी दीर्घकाळ रस्ता जाम करून ठेवला ( Monkeys Blocked Road In Washim ) होता.

जखमी माकडाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडांनी केला तासभर रास्ता रोको
अपघाती मृत्यूच्या घटना वाढल्या

जंगलात चारापाणी नसल्याने वन्यप्राणी शेतशिवार, लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. यासाठी त्यांना वारंवार रस्ता ओलांडावा लागतो. याच प्रकारातून वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू ( Accidental Death Of Wild Animals ) होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

मुक्या प्राण्यांमधील संवेदना जिवंत

स्वार्थाने बरबटलेल्या या जमान्यात माणूसच माणसाचा वैरी ठरल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. मुक्या पशूप्राण्यांमधील मुक संवेदना मात्र आजही जीवंत असल्याचे दिसून येत आहे. मुक्तपणे खेळत-बागडत असताना एका माकडाला अचानक आज महागाव कारंजा रस्त्यावर एका टाटा आयशर वाहनाने धडक दिली. यादरम्यान तेथे असलेले इतर माकडं त्याच्या मदतीला एकवटले. ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक त्या माकडाने जीव सोडल्याने एकवटलेल्या माकडांनी रस्ता जाम करून ठेवला. हा सगळा प्रकार हृदय हदरवणारा होता. त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या माकडांच्या शरीर हालचालीद्वारे स्पष्ट दिसत होते.

Last Updated : Jan 1, 2022, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.