ETV Bharat / state

33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; वाशिम मधील घटना - washim crime news

रिसोड शहरात वास्तव्यास असलेल्या सुमित दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:06 AM IST

वाशिम - रिसोड शहरात वास्तव्यास असलेल्या सुमित दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

सुमित अंभोरे हा शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर स्वत:च्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी उशिरापर्यंत न उठल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतमधून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी सुमितचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.

या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे सुमितला गुरुवारी पुत्ररत्न प्राप्त झाल्याने तो माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी नांदेडला गेला होता. यानंतर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबातील सर्वांना धक्का बसला आहे. रिसोड पोलीस या प्रकरणासंबंधी पुढील तपास करत आहेत.

Intro:स्टोरी : 33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या...

अँकर : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात वास्तव्यास असलेल्या सुमित दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेतल्याची घटना आज उघडकीस आली.

सुमित अंभोरे हा शुक्रवारी रात्री 10 वाजेनंतर त्याच्या खोलीत झोपण्यास गेला होता.आज सकाळी उशिरा पर्यंत तो न उठल्याने त्याच्या कुटुंबीयांनी 1 वाजताचे सुमारास दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही आवाज न आल्याने दरवाजा तोडून त्याच्या खोलीत पाहील्यावर सुमित हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

सुमित अंभोरे ने गळफास घेण्याचे कारण कुणास ही माहीत नाही. विशेष म्हणजे सुमित हा गुरुवारी पुत्ररत्न प्राप्त झाल्याने माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी नांदेड ला गेला होता.

आज अचानक सुमित अंभोरे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने कुटुंबातील आई वडील व लहान भाऊ गांगरून गेले होते.सुमित च्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून रिसोड पोलीस पुढील तपास करत आहेत.मनमिळाऊ स्वभाच्या सुमित अंभोरे च्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..Body:33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या...
Conclusion:33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.