ETV Bharat / state

वाशिममध्ये कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण, तिघांना अटक

शहरातील पुसद नाक्यावर कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

on duty Policeman beaten in Washim
on duty Policeman beaten in Washim
author img

By

Published : Mar 29, 2021, 5:03 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:09 PM IST

वाशिम - शहरातील पुसद नाक्यावर कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत वाशिम शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी सुधाकर सोन्नर यांनी यापूर्वी नियम उल्लंघनप्रकरणी वाहन चलान केले होते.

वाशिममध्ये कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण
चलान केल्याचा राग मनात धरून शुक्रवारी सायंकाळी पुसद नाक्यावर मद्यप्राशन करून आलेल्या तिघांनी 'आज गाडी चलान करके दिखा', असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सदर पोलीस कर्मचारी तेव्हा पोलीस गणवेशात होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने पुसद नाक्यावर धाव घेत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. वृत्त प्रकाशित होईपर्यंत याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Last Updated : Mar 29, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.