ETV Bharat / state

रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षातच केली रुग्णासाठी ऑक्सिजनची सोय! - washim corona

रिक्षामध्ये ठेवलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधून ऑक्सिजन घेणारा एक रुग्ण वाशीमच्या एका खासगी कोविड रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. ऑक्सिजन प्रणालीवर असल्याने डॉक्टरही थेट रिक्षाजवळच त्याला तपासण्यासाठी आले.

रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षातच केली रुग्णासाठी ऑक्सिजनची सोय!

author img

By

Published : May 4, 2021, 8:58 AM IST

वाशिम : डिस्चार्जनंतर कोरोनावर घरीच उपचार घेणाऱ्या एका रुग्णासाठी नियमित तपासणीला येताना रिक्षातच ऑक्सिजनची सोय करण्यात आल्याची घटना वाशीममधून समोर आली आहे. या कोरोनाग्रस्ताला रुग्णालयात येण्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था असलेली रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. म्हणून त्यांच्या निकटवर्तीयांनी रिक्षातच ऑक्सिजन सिलिंडर ठेवत त्यांना तपासणीसाठी कोविड सेंटरमध्ये आणले.

डिस्चार्जनंतर नियमित तपासणीसाठी आला होता रुग्ण

रिक्षामध्ये ठेवलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधून ऑक्सिजन घेणारा एक रुग्ण वाशीमच्या एका खासगी कोविड रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. ऑक्सिजन प्रणालीवर असल्याने डॉक्टरही थेट रिक्षाजवळच त्याला तपासण्यासाठी आले. येथेच डॉक्टरांनी त्याला तपासले आणि त्याच्यावर उपचार केले. या रुग्णाला कोरोनावरील उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्जनंतरही अनेक रुग्णांना ऑक्जिजनची आवश्यकता भासत असते. या रुग्णालाही ऑक्सिजनची गरज होती. घरीच ऑक्सिजन प्रणालीची मदत हा रुग्ण घेत होता. डिस्चार्जनंतर नियमित तपासणीसाठी हा रुग्ण रुग्णालयात आला होता. यावेळी त्याच्यासाठी रिक्षातच ऑक्सिजनची सोय करण्यात आली होती. दरम्यान, हा रुग्ण रुग्णालय परिसरात आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी बघ्यांचीही चांगलीच गर्दी झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.