ETV Bharat / state

मुंबईवरून आलेल्या 'त्या' महिलेच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण! - washim corona news detail

मुंबईवरून वाशिमला येणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांना वाशिमच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, एका जणाचा अहवाल येणे बाकी आहे.

मुंबईवरुन आलेल्या 'त्या' महिलेच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 19, 2020, 12:20 PM IST

Updated : May 19, 2020, 1:26 PM IST

वाशिम - जिल्ह्यात मुंबईवरून आलेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबातील 5 जणांचे रिपोर्ट आज (मंगळवारी) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुंबईवरून परतलेल्या त्या महिलेच्या कुटुंबातील ५ जण कोरोनाबाधित

वाशिम जिल्ह्यात मुंबईवरून 7 जण आले होते. त्यातील एका 35 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने तिने मुंबईच्या खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेसह तिचा पती, 2 मुले, 1 नातेवाईक आणि 2 वृद्धांसह 16 मेच्या पहाटे थेट वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्व 7 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या हायरिस्कमधील 5 जणांचे स्वॅब रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या महिलेच्या मुलाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

जिल्ह्यामध्ये पुनः मुंबईवरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात आता केवळ 3 रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यातील 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, एकाचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : May 19, 2020, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.