वाशिम - जिल्ह्यात कोरोनाचे 15 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 115 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रिसोड तालुक्यातील 12, मंगरूळपीर शहरातील एक व कारण या तालुक्यातील 2 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ७, गजानन नगर परिसरातील १ व सिव्हील लाईन्स परिसरातील १, मांगवाडी येथील १ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील २ व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, भापूर (ता. रिसोड) येथील एका महिलेला उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्याबाहेर ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; २ व्यक्तींना डिस्चार्ज
जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दाखल असलेल्या ४ व्यक्तींची चाचणी १३ जुलैला पॉझिटिव्ह आली आहेे. यामध्ये मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा परिसरातील १ आणि उंबर्डाबाजार (ता. कारंजा लाड) येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
दोघेही वर्धा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत. तसेच अकोला व नाशिक येथे उपचार घेणाऱ्या वाशिम शहरातील दोन व्यक्तींचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
आज दुपारी ३५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ व्यक्तींचे कोरोना चााचणी निगेटिव्ह आली आहे. तर ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. यामध्ये मंगरूळपीर शहरातील १ व कारंजा लाड तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे.
कारंजा लाड शहरातील गायत्री नगर परिसरातील १ आणि शिवनगर (ता. कारंजा लाड) येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यापैकी एकजण पुणे येथून परतला आहे, तर एका व्यक्तीला ‘सारी’ची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा परिसरातील एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
दरम्यान, पुणे व औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्या दोघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 293 वर पोहोचली आहेे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . तर 115 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 171 रुग्ण वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.