वाशिम - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये गर्दी होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी कामकाजाची वेळ ठरवून दिली. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बँका चालू राहणार असल्याचे आदेश देण्यात आले. तरीही अद्याप गर्दीचे चित्र आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
या व्यतिरिक्त जिल्ह्यात बाजारांमध्ये देखील लोक विनाकारण गर्दी करत आहेत. प्रशासनाकडून सतत गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत असून देखील नियमांचे पालन होत नसल्याने सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.