वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर मजुरांचा रोजगार गेल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. बाहेर राज्यातील मजुरांची शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक मजूर मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील अशा दहा हजार गरजू कुटुंबाना खासदार भावना गवळी यांनी गावात जाऊन किराणा आणि अन्न धान्याचे वाटप केले.
यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत या मजूर कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. सरकारने लॉकडाऊन वाढविला तर यापुढे ही अन्न धान्य वाटप करणार असल्याचे गवळी यांनी यावेळी बोलताना सांगितले.