वाशिम - जिल्ह्यातील वारला येथील विवाहित महिलेने लहान मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.
वारला येथील कविता वाघ (वय २७) आणि प्रशांत वाघ (वय 6) वर्षे असे मृतांचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने आपल्या मुलासह आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.