वाशिम - परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांना जंगलाजवळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांना खाण्यापिण्याची सोयही नव्हती. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर या मजूरांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. यात रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार अमित झनक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मजूरांना एका महिन्याचे धान्य व किराणा किट देऊ केले आहे. यामुळे या मजूरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
ईटीव्ही भारतचे आभार मानताना आमदार झनल वर्धा जिल्ह्यात कामाला गेलेले मजूर आपल्या गावी परतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना चक्क जंगला जवळील शेतात नऊ दिवस क्वारंटाईन केल्याची धक्कादायक बाब 'ईटीव्ही भारत'ने समोर आणली. एवढेच नव्हेतर वरदरी खूर्द ग्रामपंचायतीने या कुटुंबियांच्या जेवणाची सोयही केली नव्हती. यामुळे या कुटुंबियांची उपासमार होत होती. याबाबत ईटीव्ही भारतच्या माध्यमातून बातमी देण्यात आली होती. ही बातमीची दखल घेत आमदार झनक यांनी या सर्व मजदूरांना मदतीचा हात पुढे केला. जंगलात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' कुटुंबांना अखेर मदत मिळाली हेही वाचा - बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांना चक्क जंगलाजवळ केले क्वारंटाईन, ना पाणी, ना खाण्याची सोय