वाशिम - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं देशभरात हाहाकार माजला आहे. तसेच देशभरात लॉकडाऊन असल्याने लोक घरातून बाहेर पडत नाहीत. अशात रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील विश्वास डोंगरे वय 40 वर्ष यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

या परिस्थितीत त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला होता. वाशिम नगरपरिषद अध्यक्ष अशोक हेड़ा यांनी पुढाकार घेतला. रिसोड पोलीस ठाणे आणि वाशिम अग्निशमन दल यांनी सुरक्षित अंतर ठेवून अंत्यविधी उरकला.