वाशिम -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला सत्ता राखण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत 52 पैकी 31 जागावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
बुधवारी झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेच्या एकूण जागेत गत निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या असून, 14 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेस 11 जागा शिवसेनेकडे 6 जागा असल्याने जिल्हा परिषद मधील एकूण 52 पैकी महाविकास आघाडीकडे 31 जागा असल्याने महाविकास आघाडी सत्तेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
हेही वाचा - क्रुझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा - LIVE UPDATES: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक: महाविकास आघाडी वरचढ, नागपुरात काँग्रेस मजबूत