वाशिम - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे 11 च्या नंतर वाशिमच्या व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवांची आस्थापने स्वतःच बंद केली आहेत. तर वाशिम शहरातील रस्त्यावर दुपारी 11 च्या नंतर शुकशुकाट दिसून येत आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी पाटणी चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आता या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त करत असून त्यांना समज देण्यात येत आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी हे रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत.
वाशिम : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने सुरू, दुकानदारांकडून नियमांचे पालन
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे 11 च्या नंतर वाशिमच्या व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवांची आस्थापने स्वतःच बंद केली आहेत.