वाशिम - मागील काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याची झळ वन्यप्राण्यांना बसत आहे. आज सकाळच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी शेतशिवारातील विहिरीत पडला.
वनविभागाला याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी पोहचून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली. मात्र, बिबट्या विहिरीतील कपारीत जाऊन बसल्याने त्याला बाहेर काढण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत.