वाशिम - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांना समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्या विरुद्ध जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयात ( Washim District Court ) हजर राहण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. न्यायालयाचा संबंधित आदेश घेऊन कुर्ला पोलीस स्टेशनचे कर्मचारी सलग 3 दिवस नवाब मलिक यांच्या बंगल्यावर गेले असता ते घरी नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात पुढील सुनावणी 1 जानेवारी ( Next Hearing is January 1 ) रोजी होणार आहे. त्यामुळे आता नवाब मलिक पुढील सुनावनीला हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जात प्रमाणपत्रावरून काय सुरू आहे वाद?
कॉर्डलिया क्रूझवरील ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले होते. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला. तसेच कारवाईचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेटही त्यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. वानखेडे कुटुंब आणि मलिक यांच्यात यावरून जुंपली आहे. नवाब मलिक यांनी समीरच्या जात प्रमाणपत्रात छेडछाड केल्याचा गंभीर आरोप समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही केला होता. क्रांती रेडकर यांनी मलिक यांनी प्रतिउत्तर दिले. त्या म्हणाल्या होत्या की, समीर हिंदू आहेत. माझ्या सासूबाईच्या आनंदासाठी त्यांनी निकाह केला होता. त्या कागदपत्रांचा माझ्या सासऱ्यांशी व समीर वानखेडेंशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा - NCP Slams PM : 'गंगाने बुलाया है' म्हणणार्या पंतप्रधानांनी अजून गंगा स्वच्छ केली नाही - नवाब मलिक