वाशिम- जिल्ह्यातील वनोजा येथील अजित इंगोले व त्यांच्या कुटुंबीयांनी चिमण्यांसाठी तसेच इतर पक्ष्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून घरटी बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार आणि दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. आपण माणसं घरातच बसून असतो मात्र, पक्ष्यांना अन्नासाठी वणवण करावी लागते. पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची संख्या घटते आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रती प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपावी, या उद्देशाने इंगोले कुटुंबाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
स्वत:च्या घरच्या आवारात ५० घरटे
अतुल यांनी स्वत:च्या घरच्या आवारात पक्ष्यांसाठी ५० घरटी बनवली आहेत. तसेच दर महिन्यात आणण्यात येणारे रेशनचे तांदुळ हे चिमण्यांसाठी आणि इतर पक्ष्यांसाठी राखीव असतात. वाढत्या उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून घऱाच्या आवारात अतुल यांनी मोठे जलपात्र बांधले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणत पक्ष्यांचा किलबिलाट अजित यांच्या घऱच्या परिसरात ऐकायला येतो. आजच्या या धावपळीच्या जगात माणूसकी कुठेतरी हरवत चालली असे वाटतं होते. मात्र, अजित सारख्या माणसांनी ती माणूसकी जपून ठेवल्याचे दिसून येते.
हेही वाचा- राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद