ETV Bharat / state

वाशिम : भारतीय स्टेट बँकच्या एटीएमवर दरोडा, 13 लाख रुपये लुटले

दि. मध्यवर्ती अकोला बँकेच्या किन्हीराजा बँक दरोड्यानंतर आठ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

वाशिम
author img

By

Published : May 9, 2019, 10:42 AM IST

Updated : May 9, 2019, 2:28 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील शिवणी येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 13 लाख रुपये लुटल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आठवड्याभरात बँक लुटीची वाशिम जिल्ह्यात ही दुसरी घटना असून याआधी चोरट्यांनी किन्हीराजा येथे दि अकोला जिल्हा बँकेत दरोडा टाकून तिजोरीसह 14 लाख 91 हजार रुपये लंपास केले होते.

वाशिम

दरम्यान, पीक कर्ज वाटप सुरू असल्याने दोन दिवसांआधी स्टेट बँकेच्या शिवनी एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम भरण्यात आली होती. या शाखेत सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम फोडले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. बँक आणि एटीएममध्ये जिल्ह्यात आठवड्याभरातील ही दुसरी चोरीची घटना असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Intro:Body:

washim crime

Conclusion:
Last Updated : May 9, 2019, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.