वाशिम - 'जन गण मन' असे राष्ट्रगीताचे सूर कानी पडताच प्रत्येक भारतीयाची मान उंचावते. नकळत स्फूर्ती देणाऱ्या या शब्दांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जागेवर उभे राहून सलामी देतात. या शब्दांची आणि सुरांची नुसती सुरुवातही प्रत्येक भारतीय नागरिकास स्फूर्ती देणारी आहे. या राष्ट्रगीताची राष्ट्रधून ही अंगावर रोमांच उभी करणारी आहे. त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील चेतन सेवांकुर येथील दिव्यांग विजय खडसे हा चक्क टाळ्यांच्या तालावर राष्ट्रगीत सादर करतो. जन्मापासूनच अंध असलेल्या विजयने सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
राष्ट्रगीत आपण तोंडी किंवा बँड पथकाला तालावर म्हणताना बघितले. परंतु, केकतउमरा येथील चेतन सेवांकुरचा विजय हा चक्क टाळ्यांच्या तालावर राष्ट्रगीत सादर करत असल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे.

केकतउमरा येथील विजय करतो टाळ्यांच्या तालावर राष्ट्रगीत -
वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचा मुलगा चेतन हा जन्मापासूनच अंध आहे. उचितकर यांनी इतर काही अंध मुलांना दत्तक घेऊन चेतन सेवाकुर आश्रम स्थापन केला. या ठिकाणची अंध मुले संपूर्ण राज्यात गायनाचे तसे समाज प्रबोधनाचे उपक्रम राबवितात. या उपक्रमात आश्रमातील विजय टाळ्यांच्या तालावर राष्ट्रगीत सादर करतो. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - 75th Independence Day: मुलींच्या यशात विकसित भारताची झलक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद