ETV Bharat / state

हरिभाऊ राठोड यांना मंत्रिपद मिळाले, तर स्वागत करू - महंत सुनील महाराज - washim sunil maharaj news

हरिभाऊ राठोड यांची वनमंत्री म्हणून नियुक्ती केली, तर आम्ही त्यांच्या निर्णयांचे स्वागत करू. मात्र, त्यांचे वय 70 वर्षाच्या वर आहे, अशी प्रतिक्रिया पोहारादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी दिली.

if-haribhau-rathore-gets-ministerial-post-we-will-welcome-him-said-mahant-sunil-maharaj
हरिभाऊ राठोड यांना मंत्रिपद मिळाले, तर स्वागत करू - महंत सुनील महाराज
author img

By

Published : Mar 13, 2021, 11:57 AM IST

वाशिम - हरिभाऊ राठोड यांना वनमंत्री बनवा, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री यांना दिले आहे. त्यामुळे त्यांनी जर हरिभाऊ राठोड यांची वनमंत्री म्हणून नियुक्ती केली, तर आम्ही त्यांच्या निर्णयांचे स्वागत करू. मात्र, त्यांचे वय 70 वर्षाच्या वर आहे, अशी प्रतिक्रिया पोहारादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी दिली.

प्रतिक्रिया

राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले होते पत्र -

संजय राठोड हे बंजारा समाजाचे प्रतिनिधित्त्व करत होते. येणाऱ्या काळात शिवसेनेला बंजारा समाजाची मोठी गरज लागणार आहे. याच समाजातून आपणही येत असल्याने आता वन मंत्री पद मला देण्यात यावे. मला काँग्रेसकडून सहज मंत्रीपद मिळाले असते. मात्र तुमच्यासाठी मी माझी आमदारकी धोक्यात आणली. निवडणुकी काळामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून यावेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन केलेल्या कामाचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. तसेच आपण भटक्या विमुक्त जाती, बंजारा समाज, ओबीसी समाज यांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे याचा फायदा शिवसेनेला येणाऱ्या काळात होईल, असे हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - 'उद्या'ला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार आज नाकारला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.