वाशिम - जन्मताच दिव्यांग असलेल्या १२ मुलांच्या जीवनात प्रकाश टाकून जगण्याची जिद्द निर्माण करण्याचा प्रयत्न पांडुरंग उंचीतकर करत आहेत. होळी सणानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उंचीतकर यांनी होळी साजरी केली. मनोरंजन म्हणून संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दिव्यांगाना साह्य करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा येथील या अवलियाने त्यांची जबाबदारी घेतली आहे.