ETV Bharat / state

पोहरादेवीत हिंदू-मुस्लीम ऐक्य; रामराव महाराजांच्या भाविकांना केले अन्नदान - वाशिम हिंदू-मुस्लिम ऐक्य न्यूज

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे काल निधन झाले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आलेल्या भाविकांना हिंदू-मुस्लीम ऐक्य पहायला मिळाले.

Food Donation
अन्नदान
author img

By

Published : Nov 1, 2020, 4:51 PM IST

वाशिम - पोहरादेवी येथे हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक पहायला मिळाले. बंजारा समाजाचे धर्म गुरू तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंच्या संख्येत भाविक पोहरदेवी येथे दाखल झाले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून तेथील मुस्लीम बांधवांनी खिचडीचे वाटप केले. कर्नाटक आणि हैदराबाद येथून आलेल्या भाविकांनी खिचडी वाटप करणाऱ्या मुस्लीम युवकांच्या कार्याचे कौतुक केले. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी इमरान खान यांनी याचा आढावा घेतला...

पोहरादेवीतील मुस्लिम बांधवांनी खिचडीचे वाटप केले

कोण होते रामराव महाराज?

बंजारा समाजाचे रामराव बापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935ला पोहरादेवी येथे झाला होता. रामराव बापू महाराज यांना पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर परिसरातील 52 गावाच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या 14व्या वर्षी 1948मध्ये बसवले. 12 वर्ष अनुष्ठान आणि 12 वर्ष मौन धारण केल्यावर रामराव महाराज यांनी देश भ्रमण सुरू केले होते.

महाराज अनंतात विलिन -

तपस्वी रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, बंजारा समाजाचे महंत व हजारो भक्त उपस्थितीत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्या सोबत महंत शेखर महाराज व राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन राठोड होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.