ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडे-घरे कोसळली, पिकांचेही नुकसान - वाशिममध्ये जोरदार पाऊन

वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरे, झाडे कोसळली आहेत. तर, एमएसईबीच्या मोठ्या लाईनचे 4 टावर जमीनदोस्त झाले आहेत.

washim
वाशिम
author img

By

Published : May 28, 2021, 3:46 AM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर तालुक्यासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी ते गिंभा परिसरातील घरांवरील टीनपत्रे उडाले. तर एमएसईबीच्या मोठ्या लाईनचे 4 टावर जमीनदोस्त झाले आहेत. शिवाय झाडेही कोसळली आहेत.

वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

बागा, भाजीपाल्यांचे नुकसान; दर कडाडणार

गेल्या तीन दिवसांपासून या भागात कमालीची उष्णता जाणवत आहे. काल (27 मे) सायंकाळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग जमू लागले आणि पावसाला सुरूवात झाली. सोसाट्याचा वारा असल्याने काही घरांवरील टीनपत्रे उडाले. या पावसामुळे लगतच्या भागातील आंबे, लिंबू, केळीच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्या कमी प्रमाणात येणार आहेत. परिणामी भाव कडाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरिप हंगामातील पूर्वमशागतिला वेग येणार

दरम्यान, या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर खरिप हंगामातील पूर्वमशागतिला वेग येणार आहे. त्यामुळे बळीराजांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे ते चिंतेत आहेत.

हेही वाचा - अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.