वाशिम - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून आज जुन्या जिल्हा पोलीस मुख्यालयात सामूहिक रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी हे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
या शिबिरात आज 101 पोलीस बांधव-भगिनींनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी रक्तदान करून केली. त्यांच्यासह अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बनसोड, उपविभागीय पो, अधिकारी गृह केडगे,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सुद्धा रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.