वाशिम - सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे. वाशिम तालुक्यातील इलखी येथे हा घक्कादायक प्रकार घडला. रमेश चव्हाण असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घरचा कर्ता गेल्याने आता चव्हाण कुटंबावर मोठे संकट कोसळले आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद
रमेश यांच्यावर बँकेचे कर्ज होते. सततची शेतीतील नापिकी आणि घरातील वाढता खर्च यामुळे बँकेचं कर्ज त्यांना फेडणे शक्य झाले नाही. शेवटी रमेश यांनी विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.